लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत एकतर्फी संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
जालना लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. त्याबरोबरच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, विविध राजकीय पक्षांची भूमिका विचारात घेता जय, पराजयावरून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी आपल्या अखत्यारीत एकतर्फी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. हा आदेश दुकाने, आस्थापनांना लागू असेल.
खालील बाबींना सूट
शासकीय/निमशासकीय कार्यालये.
दूध वितरण.
पाणीपुरवठा
रेल्वे व्यवस्था.
दवाखाने, औषधी दुकाने,
रुग्णवाहिका.
विद्युत पुरवठा
प्रसार माध्यमे, मीडिया