उलटी होते या भीतीने तुम्ही प्रवास करण्यास घाबरताय का! आता बिनधास्त प्रवास करा.. वाचा उलटीवरील रामबाण उपाय

प्रवास आणि उलटी होणे हे समीकरण बऱ्याच जणांसाठी पक्कं झालेलं आहे. त्यामुळेच उलट्या होतात म्हणून प्रवास टाळणारे आपल्याला आजूबाजूला आढळतात. प्रवासात उलटी होऊ नये म्हणून, साध्या सोप्या गोष्टी केल्यास, उलटीचा त्रास नक्कीच कमी होईल. प्रवासाला निघताना उलटी होऊ नये म्हणून, गोळ्या खाण्यापेक्षा सोपे उपाय करणं हे केव्हाही हितकारक आहे. उलटी होऊ नये म्हणून प्रवासाला निघण्याआधी या टिप्सचा नक्की अवलंब करा. 
 
पुदीना – प्रवासादरम्यान तुम्हाला चक्कर येणे, उलट्या होणे आणि मळमळ होण्यास त्रास होत असेल तर पुदीना सर्वात महत्त्वाचा आहे. मिंट सिरप किंवा पुदीन्याचे पान आपल्याबरोबर ठेवा आणि प्रवास करण्यापूर्वी ते तोंडात ठेवावे. आपल्याला आता मिंटची टॅब्लेटही उपलब्ध आहे.
 

लिंबू-मीठ फायदेशीर
 
प्रवास करताना मळमळ आणि उलट्या झाल्यास आपण लिंबाचा रस पाण्यात पिळून त्यात मीठ टाकून सेवन करू शकता. प्रवासात जाण्यापूर्वी आपल्याबरोबर लिंबू, मीठ आणि पाणी घेऊन जाण्यास विसरू नका.
 
 
लिंबूवर्गीय फळे आणि रस
 
आपण जिथे जात असाल तिथे लिंबूवर्गीय फळे किंवा त्यांचा रस आपल्याबरोबर ठेवा. उलट्या, चक्कर येणे आणि मळमळ होण्याची समस्या येते तेव्हा आपण ते सेवन केले पाहिजे. 
 
आले
 
प्रवासादरम्यान आल्याचा छोटा तुकडा बरोबर बाळगा. प्रवास करताना उलट्या, चक्कर येणे आणि मळमळ होण्याची समस्या येते तेव्हा आल्याच्या तुकड्यांना तोंडात ठेवा आणि चोखा. प्रवासाच्या सुरुवातीपासून तोंडात आल्याचा तुकडा ठेवू शकता.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)