ती बैठक बेकायदेशीर

युद्ध थांबवण्यासाठी किंवा शांतता नांदावी म्हणून रशिया आणि अमेरिकेत युव्रेनला डावलून सध्या चर्चा सुरू आहे. मात्र, युव्रेनशिवाय या चर्चेला काहीच अर्थ नाही. ही चर्चाच शक्य नाही, ती बैठक बेकायदेशीर असून मी माझा देश विपू शकत नाही, अशा शब्दांत युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी संताप व्यक्त केला आहे. रशिया आणि युव्रेनच्या अशाप्रकारे जवळ येण्याबद्दलही झेलेन्स्की यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांच्या टीमने युव्रेनबद्दल अधिक अचूक माहिती मिळवावी. युव्रेनमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिनवर पुणीही विश्वास ठेवत नाही. युव्रेनचे सैन्य खूप मजबूत आहे. आमच्या सहभागाशिवाय घेतलेला कोणताही निर्णय स्वीकारणार नाही. ही बैठक बेकायदेशीर असल्याचे सांगत झेलेन्स्की यांनी सौदी अरेबियाचा दौरा 10 मार्चपर्यंत पुढे ढकलला. झेलेन्स्की यांनी तुर्पस्थानात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची भेट घेतली आणि सौदी अरेबियाचा दौरा पुढे ढकलत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, य्सौदी अरेबियात मंगळवारी झालेल्या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर सहमती दर्शवली.