यूट्यूबवर लवकरच  व्हाईस क्वॉलिटी फिचर

यूट्यूब नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवीन अपडेट आणते. यूट्यूब लवकरच एक व्हाईस क्वॉलिटी फिचर घेऊन येणार आहे. सध्या युजर फ्रेंडली फिचरची टेस्टिंग केली जात आहे. हे फिचर रोलआऊट झाल्यानंतर युजर्स यूट्यूबवर व्हिडीओसोबत ऑडिओसुद्धा ऍडजस्ट करू शकतील.

व्हिडीओ क्वॉलिटीला मागे पुढे करता येते, परंतु आवाज तसाच राहतो. कमी जास्त केल्यानंतरसुद्धा त्याचे मॉडय़ुलेशन तसेच राहते, परंतु नवीन फिचर आल्यानंतर असे राहणार नाही. युजर्स आपल्या सोयीनुसार ऑडीओ कमी जास्त करू शकतील. हे फिचर तीन ऑप्शन सोबत येईल. पहिले ऑप्शन ऑटोमॅटिक असेल.