सेंट पीटर्सबर्ग येथे रशियाच्या 328 व्या नौदल दिनाच्या परेडमध्ये युद्धनौका आयएनएस तबरने हिंदुस्थानकडून भाग घेतला. या वेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हिंदुस्थानी नौसैनिकांकडून मानवंदना घेतली. पॅप्टन एमआर हरीश आयएनएस तबर या युद्धनौकेचे नेतृत्व करत होते. त्यांच्यासोबत या युद्धनौकेवर 280 सदस्यांचा क्रूही उपस्थित होता. या नौदल दिनात जवळपास 200 जहाजांनी भाग घेतला. परेड संपल्यानंतर सेंट पीटर्सबर्ग आणि रशियन नौदल तळावर संगीत मैफल, आर्मी बँड आणि आतषबाजीचे आयोजन केले जाणार आहे. आयएनएस तबर ही आधुनिक श्रेणीची युद्धनौका आहे. 1997 मध्ये रशियाकडून खरेदी केलेल्या क्रिवाक-3 या युद्धनौकेतून हिंदुस्थानने हे विकसित केलेली आहे. याची रचना बाल्टिक शिपयार्डने केली असून 2004 मध्ये ही युद्धनौका हिंदुस्थानी नौदलात दाखल झाली.