ट्रम्प आणि पुतीन लवकरच भेटणार, रशिया-युक्रेन युद्ध थांबणार

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोन बडय़ा नेत्यांची भेट लवकरच होणार आहे. पुतीन नेहमीच ट्रम्प यांच्यासह आंतरराष्ट्रीय नेत्यांना भेटण्यासाठी तयार असतात, असे रशियाचे प्रवत्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटले आहे. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्सकी यांच्याकडून ट्रम्प यांना शांतता प्रस्तावचे समर्थन करण्याची विनंती केली जात आहे. त्यामुळे पुतीन आणि ट्रम्प यांच्या भेटीत युक्रेन युद्धावर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पुतीन यांनी वारंवार आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संपर्क साधून आपली तत्परता दाखवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचाही यात समावेश आहे. ट्रम्प हे 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.