
‘मातोश्री’बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नीलम गोऱ्हे यांचा आणि पाकिटांचा फार जवळचा संबंध आहे. सुरुवातीला कार्यक्रमासाठी बोलवल्यानंतर त्या 300 रुपयांचे पाकीट घेतल्याशिवाय गाडीत बसत नव्हत्या. ही पाकिटे जमा करण्यासाठी त्यांच्या गाडीत एक मुलगी बसलेली असायची. पाकीट मिळाल्याची शहानिशा झाल्यानंतरच त्या गाडीत बसायच्या. नवी मुंबईत झालेल्या हळदी कुंकु कार्यक्रमानंतर त्यांनी घेतलेल्या पाकिटाचा मी साक्षीदार आहे, असा घणाघात शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला आहे.