टाटाच्या विस्तारा एअरलाइन्सचे एअर इंडियात विलीनीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे सोमवार, 11 नोव्हेंबरला विस्ताराची विमाने शेवटची उड्डाणे करणार आहेत. एअर इंडिया मंगळवार, 12 नोव्हेंबरपासून विस्ताराची सर्व उड्डाणे चालवणार आहे. त्यासाठीचे तिकीट बुकिंगही एअर इंडियाच्या संकेतस्थळावरून केले जाणार आहे.
विस्ताराची स्थापना 2013 मध्ये झाली होती. एअर इंडिया आणि विस्तारा यांच्या विलीनीकरणाचा करार नोव्हेंबर 2022 मध्ये झाला होता. सप्टेंबर 2023 मध्ये नियामक स्पर्धा आयोगाने (सीसीआय) याला मान्यता दिली होती. विलीनीकरणानंतर, एअर इंडिया ही फुल-सर्व्हिस आणि कमी किमतीच्या दोन्ही प्रवासी सेवा चालवणारी एकमेव हिंदुस्थानी विमान पंपनी आणि एअर इंडिया ग्रुप ही देशातील दुसऱया क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत एअरलाइन बनणार आहे, तसेच इंडिगोनंतरची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय एअरलाइन बनेल.
– एअर इंडिया (एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशिया इंडियासह) आणि विस्तारा यांच्याकडे एकूण 218 वाईडबॉडी आणि नॅरोबॉडी विमाने आहेत, जी 38 आंतरराष्ट्रीय आणि 52 देशांतर्गत सेवा देतात.
– विलीनीकरणानंतर सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 3 हजार 194.5 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूकदेखील करणार आहे.
– दोन्ही एअरलाइन्सच्या विलीनीकरणानंतर सिंगापूर एअरलाइन्सची एअर इंडियामध्ये भागीदारी 25.1 टक्के होईल. यासाठी पंपनीची सुमारे 2 हजार 96 कोटी रुपये थेट गुंतवणूक आहे. त्याचवेळी नवीन उपक्रमात टाटा समूहाचा 74.9 टक्के हिस्सा असेल.