शिवाजी महाराजांवर टीका करून मुस्लीम राष्ट्रात पळून जाणे म्हणजे नवा हिंदुत्ववाद का? विश्वंभर चौधरी यांची टीका

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर हा फरार आहे. कोरटकर हा कोलकाता मार्गे दुबईला पळून गेल्याचे देखील बोलले जात आहे. कोरटकर याचे दुबईतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून सध्या राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

राजकीय विश्लेषक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी देखील एक ट्विट करत भाजप व राज्य सरकारला सवाल केला आहे. ”वा रे हिंदुत्ववादी! शिवाजी महाराजांवर टीका करून मुस्लीम राष्ट्रात पळून जाणे म्हणजे नवा हिंदुत्ववाद का? असा सवाल त्यांनी भाजप व सत्ताधाऱ्यांना केला आहे.