प्रख्यात चित्रकार विशाल साबळे यांचे ‘नायिका-रिक्रिएटिंग द एसेन्स ऑफ फेमिनाइन’ या शीर्षकांतर्गत जहांगीर आर्ट गॅलरी येथे चित्रांचे प्रदर्शन होणार आहे. मुंबईत उद्या, 31 डिसेंबरपासून ते 6 जानेवारी 2025 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7.00 या वेळेत आयोजित एकल प्रदर्शनात स्त्रीत्वाचे नवे अनोखे रंग सादर केले जातील. स्त्री शक्ती आणि भारतीय अस्मिता ही चित्र प्रदर्शनाची थीम आहे. गेल्या 16 वर्षांहून अधिक काळ स्त्रीत्वाचे सौंदर्य, लवचिकता आणि सशक्तीकरणाला मूर्त रूप देणारी शक्ती या थीमवर विशाल साबळे चित्र प्रदर्शन करत आहेत.
हे प्रदर्शन केवळ गूढ कथांचे मनोरंजन नाही तर स्त्रीत्वाचे प्रतिबिंब आहे. आपल्या जीवनात या प्रतिकांचा कसा समावेश आहे, तो आपल्या जीवनावर कसा परिणाम करतो हे माझ्या प्रत्येक चित्रातून आजच्या कला प्रेमींना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे साबळे यांनी सांगितले.