
प्रख्यात संगीतकार विशाल दादलानी याने इंडियन आयडल या शोला कायमचा रामराम ठोकला आहे. गेली सहा सीझन विशालने या शोसाठी परीक्षकाचे काम वठवले होते. विशालने हा शो सोडत असल्याचे नुकतेच जाहीर केलेले आहे. नुकताच आता सुरू असलेल्या सीझन 15 चा महाअंतिम सोहळा पार पडला. इंडियन आयडल सोडताना विशाल म्हणाला, मला पुन्हा एकदा म्युझिक बनवण्याच्या कामामध्ये स्वतःला व्यस्त ठेवायचे आहे. तसेच इतर अनेक संगीताचे कार्यक्रमही करायचे आहेत. विशालला या शोसाठी प्रत्येक भागासाठी साडेचार लाख फी मिळत होते.
View this post on Instagram
शो सोडण्याविषयी बोलताना विशाल म्हणतो की, ‘ मी आता फक्त तुम्हाला एवढंच देऊ शकतो मित्रांनो!’ या शोचे सहा सीझन केल्यानंतर ही आजची रात्र माझी शेवटची रात्र परीक्षक म्हणून असणार आहे. संपूर्ण टीम आणि निर्मात्यांचे त्याने आभार मानतो. हा सेट आणि हा शो माझ्यासाठी खरोखर घर होते! आता यापुढे म्युझिक बनवण्याची, कॉन्सर्ट करण्याची आणि कधीही मेकअप न करण्याची वेळ आलेली आहे! जय हो.
विशाल दादलानी कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतो. त्याने नुकतेच घिबली ट्रेंडवरही सडेतोड भाष्य केले होते. विशालने आत्तापर्यंत रा वन, ओम शांती ओम, बॅंग बॅंग यासारख्या अनेक चित्रपटांसाठी संगीतकार म्हणून काम पाहिले होते.