मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका महिलेने तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध कौमार्य चाचणी केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार, लग्न झाल्यानंतर मधुचंद्राच्या रात्री तिच्या सासरच्या लोकांनी कौमार्य चाचणीच्या नावाखाली तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. या प्रकरणात, इंदूर जिल्हा न्यायालयाने ही प्रथा मागासलेली आणि बेकायदेशीर आहे, असे सांगत सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण मध्य प्रदेशातील कौमार्य चाचणीविरुद्धचे पहिले कायदेशीर प्रकरण ठरले आहे.