धोनीचं नाव घेत पुढे पुढे करणाऱ्या रायडूला सेहवागनं सुनावलं, चूक सुधारत लाईव्ह समालोचनात म्हणाला…

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपर किंग्सचेही प्रतिनिधित्व केलेला अंबाती रायडू हा महेंद्रसिंह धोनीचा मोठा चाहता आहे. धोनी फलंदाजीला आल्यावर रायडू त्याच्या पुढे पुढे करणार नाही असे कधी झाले नसेल. चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स संघात मंगळवारी झालेल्या लढतीवेळीही धोनी फलंदाजीला आल्यावर समालोचन करणाऱ्या रायडूने एक विधान केले. यावेळी त्याच्यासोबत वीरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्राही होते. रायडूचे विधान ऐकून वीरेंद्र सेहवागने त्याचे स्लेजिंग केले.

धोनी हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. 43 व्या वर्षी तो चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात उतरत आहे. मात्र पहिले काही सामने तो तळाला फलंदाजीला आल्याने त्याच्यावर टीकाही झाली. त्यानंतर पंजाबविरुद्ध तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 12 चेंडूत 27 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने तीन षटकार आणि एक चौकार ठोकला. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या लढतीनंतर समालोचन करताना रायडूने धोनीचे कौतुक केले. त्यावेळी आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवागही पॅनलमध्ये होते.

झारखंडचा अनकॅप्ड खेळाडू धोनी हेलिकॉप्टर शॉट्स मारायचा, पण तो फलंदाजीसाठी उशिरा आला, असे आकाश चोप्रा म्हणाला. यावर रायडू म्हणतो की, तो थला असून त्याने जबरदस्त खेळी केली. तो एक खास खेळाडू आहे. त्याच्यामुळे कॉमेंट्री बॉक्समध्येही उत्साह वाढतो. तसेच रायडूने धोनीचा उल्लेख तरुण खेळाडू असाही केला. यावर सेहवागने रायडूला डिवचत म्हटले की, तो खास खेळाडू आहे हे मी नाकारत नाही. पण तरुण खेळाडू हेलिकॉप्टर शॉट मारायचा असे तुम्ही म्हणालाl, पण मी फक्त व्याकरण दुरुस्त करतो आणि तो अजूनही हेलिकॉप्टर शॉट्स मारतो.

चेन्नईसाठी वाईट अन् गोड बातमी, ऋतुराजच्या दुखापतीमुळे धोनीकडे नेतृत्व

दरम्यान, पंजाब किंग्सविरुद्ध मंगळवारी झालेल्या लढतीत धोनीने आणखी एका खास विक्रम आपल्या नावे केला. धोनी आयपीएलमध्ये 150 झेल पूर्ण करणारा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. नेहाल वढेरा याचा झेल घेताच त्याने हा महत्त्वाचा टप्पा गाठला. या यादीमध्ये दिनेश कार्तिक 137 झेलसह दुसऱ्या स्थानावर आहे. 150 झेलसह धोनीच्या नावावार 45 स्टंपिंगचीही नोंद आहे.