‘हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता’ असे सांगत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना 440 व्होल्टचा धक्का दिला. ‘आम्हाला जगज्जेतेपद साध्य करायचे होते. एक वेळ अशी येते की, धावा करता येत नाहीत. मात्र, देव महान आहे. त्यामुळेच आज मला धावा करता आल्या. बळजबरी करण्यापेक्षा परिस्थितीचा आदर केला. आता पुढच्या पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे. काही नव्या दमाचे खेळाडू टीम इंडियाला पुढे नेतील अन् देशाचा तिरंगा फडकवत ठेवतील’, अशा विश्वासही कोहलीने व्यक्त केला.