पर्थ कसोटीचा तिसरा दिवस विक्रमांचा ठरला. पर्थवर एकाच दिवशी हिंदुस्थानच्या यशस्वी जैसवाल आणि विराट कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांची आठवण ताजी केली. वयाची 23 वर्षे पूर्ण होण्याआधीच यशस्वी जैसवालने आपले चौथे दीडशतक साजरे करत ब्रॅडमन यांच्या पाच दीडशतकांचा पाठलाग कायम ठेवला आहे. दुसरीकडे विराट कोहलीने 16 महिन्यांनंतर तिसावे शतक पूर्ण करत ब्रॅडमन यांच्या 29 कसोटी शतकांना मागे टाकले. त्याचप्रमाणे त्याने ऑस्ट्रेलियातील सातवे कसोटी शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या 6 शतकांनाही मागे टाकले.
यशस्वीने दीडशतक साजरे करत ब्रॅडमन यांच्या
5 दीडशतकांच्या विक्रमांना आव्हान दिले. वयाची 23 वर्षे पूर्ण होण्याआधी चार दीडशतके आतापर्यंत ब्रॅडमन आणि ग्रीम स्मिथ या दोन फलंदाजांनाच शक्य झाले आहे. स्मिथने 4 तर ब्रॅडमन यांनी 5 दीडशतके ठोकली आहेत. यशस्वीने स्मिथची बरोबरी साधली आहे तर आता त्याला ब्रॅडमनची बरोबरी साधण्याची संधी आहे. तसेच विराटने ब्रॅडमन यांच्या 29 शतकांना मागे टाकत 30 वे शतक ठोकले.