
टीम इंडियाचा ‘रनमशीन’ विराट कोहली हा मैदानावर जेवढा आक्रमक अंदाजात खेळतो तेवढाच खेळाचा मनमुराद आनंद लुटतानाही दिसतो. फलंदाजी करताना शतक ठोकल्यावर, क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजांनी विकेट घेतल्यावर त्याचा आक्रमकपणा दिसतो. एवढेच नाही तर मैदानात डान्स करून प्रेक्षकांचे मनोरंजनही करतो. आताही त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात एमए चिदंबरम मैदानात सामना रंगला. गेल्या 17 वर्षात बंगळुरूला चेपॉकवर चेन्नईविरुद्ध विजय मिळवता आला नव्हता. मात्र शुक्रवारचा दिवस बंगळुरुचा होता. बंगळुरूने चेन्नईचा घरच्या मैदानावर 50 धावांनी विजय मिळवला. 2008 नंतर पहिल्यांदाच बंगळुरूने चेपॉकवर विजय मिळवला. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात बंगळुरूने हा कारनामा केला. हा विजय बंगळुरूच्या संघाने दणक्यात साजरा केला.
विराट कोहलीला न विचारताच त्याची बॅग उघडली, परफ्यूमही वापरला; चिकाराच्या वर्तनानं RCB चे खेळाडू हैराण
विराट कोहलीसह बंगळुरूच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये गाणी लावून डान्स केला. याचा व्हिडीओ बंगळुरूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. विराटसह लुंगी निगिडी, लियाम लिव्हिंग्स्टन, फिल सॉल्ट यांच्यासह बंगळुरूच्या खेळाडूंचे पाय गाण्यावर थिरकले.
View this post on Instagram
बंगळुरूची सांघिक कामगिरी
फिल सॉल्ट (32) आणि देवदत्त पडिक्कल (27) यांची घणाघाती खेळी आणि सोबतीला विराटच्या 30 चेंडूंतील 31 धावांच्या खेळीने बंगळुरूला 117 धावांपर्यंत नेले, पण संघाच्या धावसंख्येला बुलेटसारखा वेग दिला तो रजत पाटीदारच्या 32 चेंडूंतील 51 धावांच्या खेळीने. त्याच्या या अर्धशतकानेच बंगळुरूला दोनशे धावांच्या मार्गावर नेले. तळाला टीम डेव्हिडने 8 चेंडूंत 3 षटकारांसह 22 धावा केल्यामुळे बंगळुरू 7 बाद 196 धावांपर्यंत पोहोचला. बंगळुरूच्या 197 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचे वीर 146 धावांतच धारातीर्थी पडले. बंगळुरूने 50 धावांनी दणदणीत विजयाची नोंद करत सलग दुसरा विजय नोंदवला.
‘लॉर्ड’ शार्दुल, नाव लक्षात ठेवा! हैदराबादला ‘वेसण’ घातल्यानंतर सोशल मीडियावर ठाकूरचीच हवा