
मुंबई लोकल ट्रेनला मुंबईची ‘लाईफलाईन’ असे म्हटले जाते. मिनिटभर जरी लोकल ट्रेनची सेवा विस्कळीत झाली तरी पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फटका बसतो. प्रवाशांनी खचाखच भरलेली लोकल कधीकधी वेगळ्याच कारणाने चर्चेत येते.
कधी लोकलच्या दरवाजात उभ्या तरुणांची स्टंटबाजी, हुल्लडबाजी, कधी प्रवाशांची हाणामारी, तर कधी लोकलमधील ग्रुप बाजी. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रवाशांमध्ये वाद भडकतो आणि मारामारीही होते. असाच प्रकार बुधवारी विरार-अंधेरी लोकलमध्ये घडला.
विरारच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून 8 वाजून 14 मिनिटांनी सुटणाऱ्या स्लो लोकलमध्ये विरार-अंधेरी लोकलमध्ये ग्रुपबाजीवरून मोठा राडा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांची पळापळ झाली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून लोकलमध्ये राडा घालणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
विरार-अंधेरी लोकलमध्ये ग्रुप बाजीवरून प्रवाशांमध्ये तुंबळ राडा, बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांची पळापळ pic.twitter.com/3mVaIF2ter
— Saamana Online (@SaamanaOnline) April 2, 2025