Viral Video : तिघे पुरात सापडले; मित्र-मैत्रीणींची ती शेवटची मिठी ठरली!

मेत्रीचे अनेक किस्से, व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

सदर घटना इटलीमध्ये घडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरूणी आणि एक तरूण नदीच्या मधोमध अडकल्याचे दिसत आहेत. डेली मेल या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय पैट्रिजिया कॉर्मोर्स, 23 वर्षीय बियांका डोरोस आणि 25 वर्षीय कॉर्मोसचा प्रियकर क्रिस्टियन मोलनार हे तिघे वाहत्या पाण्याच्या मधोमध अडकले होते. पाण्याच्या प्रचंड प्रवाहापासून वाचण्यासाठी तिघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. मात्र पाण्याच्या वेगापूढे त्यांचा निभाव लागला नाही आणि पाण्याच्या प्रवाहात तिघेही वाहून गेले. दोघांचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले मात्र क्रिस्टियन मोलनारा याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

“आम्ही त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे दोरी फेकली, पण ते अक्षरश: आमच्या डोळ्यांसमोर पुराच्या पाण्यात वाहून गेले. वाहून जाण्याचे मुख्य कारण अतिवृष्टी नसून नदीचा जोरदार प्रवाह होता,” अशी माहिती प्रांतीय अग्निशमन विभागाच्या प्रमुख जॉर्जिया बेसिल यांनी दिली.