उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये महिला प्राचार्याला ऑफिसमधून बाहेर हाकलण्यात येत असल्याचे दिसतं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिशप जॉन्सन गर्ल्स विंग या शाळेने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये असणाऱ्या आणि लखनऊ डायओसीज म्हणजे उत्तर हिंदुस्थानातील चर्चशी संबंधित असलेल्या ‘बिशप जॉन्सन गर्ल्स विंग’ या शाळेच्या प्राचार्यांना जबरदस्ती बाहेर हकलण्यात आल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये शाळेच्या महिला प्राचार्य पारूल सोलोमन यांना जबरदस्ती खुर्चीवरून उठवून बाहेर हकलण्यात आले व त्यांच्या जागी नवीन प्राचार्यांना टाळ्यांच्या गजरात खूर्चीवर बसवण्यात आले. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच शाळेवर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवरून शाळेने स्पष्टीकरन देत आपली बाजू मांडली आहे.
लखनऊच्या डायोसीजने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये दिसत असलेला सर्व प्रकार 11 फेब्रुवारी झालेल्या RO-ARO पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणामध्ये बिशप जॉन्सन गर्ल्स विंग या शाळेतील काही लोकांना ATS ने अटक केली होती, यामध्ये महिला प्राचार्य पारूल यांचा सुद्धा समावेश असल्याचे उघड झाले होते. पेपरफुटी प्रकरणात प्रायार्य पारूल यांचे नाव आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली व त्यांना चार महिन्यांपूर्वी काढूण टाकण्यात आले होते. शाळेचे नाव खराब होत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे बिशप मॉरिस एडगर दान यांनी सांगितले. असे असले, तरी पारूल सोलोमन यांनी कर्नलगंज पोलीस स्थानकात शाळेतील कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.