पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. टीम इंडिया पाकिस्तानात खेळायला जाणरा नाही हे BCCI ने याआधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे हायब्रीड मॉडेलवर स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. तसेच आयसीसी त्यासाठी प्रयत्न करत आहे. असे असताना आता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मोठा हिंसाचार उसळला आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणाऱ्या संघांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.
इम्रान खानच्या समर्थकांनी इस्लामाबादमध्ये जोरदार राडा करत मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीलंकेचा अ संघ पाकिस्तान शाहीन्स या संघाविरुद्ध वन डे मालिका खेळणार होता, मात्र हिंसाचारामुळे त्यांनी अर्ध्यातून मालिका सोडली. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनवार पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेची काही देशांनी खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्धा उपस्थित करत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजनपद पाकिस्तान गमावणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयसीसी यासंदर्भात काय निर्णय घेणार हे पुढील काही दिवसांमध्ये समजेलचं.
इम्रान खान यांच्या घोषणेनंतर पाकिस्तानात निदर्शने; तीन मागण्यांसाठी समर्थक आक्रमक