बांगलादेशात ऑपरेशन डेव्हिल हंट

बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसा सुरू झाली असून माजी मंत्री एकेएम मोझम्मेल हक यांच्या निवासस्थानी हल्ला झाला. विद्यार्थी आणि नागरिकांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी बांगलादेशच्या अंतरिम सरकारने ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’चे आदेश दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी सरकारने कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या ऑनलाइन संबोधनानंतर बांगलादेशात अवामी लीगच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत.