
मुंबई पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिव जयश्री भोज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे भोज यांच्या बदली आदेशात नमूद करण्यात आले आहे.