विनीत जोशी बनले UGC चे कार्यकारी अध्यक्ष

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) चे माजी अध्यक्ष प्राध्यपक मामीदला जगदीश कुमार यांच्या निवृत्तीनंतर केंद्रातील उच्च शिक्षण विभागाचे सचिव डॉ. विनीत जोशी यांच्याकडे यूजीसीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांच्यावर तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. युजीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होईपर्यंत त्यांच्यावर ही अतिरिक्त जबाबदारी असेल.

कोण आहेत विनीत जोशी?

डॉ. विनीत जोशी हे 1992 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (आयआयएफटी) मधूनही शिक्षण घेतले आहे. मणिपूरचे मुख्य सचिव, निवासी आयुक्त आणि सीबीएसई अध्यक्ष यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी आतापर्यंत काम केले आहे.

डीआरडीओमध्ये 150 पदांची भरती

माजी अध्यक्ष प्रोफेसर एम. जगदीश कुमार यांचा कार्यकाळ संपला आहे. प्राध्यापक एम. जगदीश कुमार यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये यूजीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते 7 एप्रिल 2025 ला पदावरून निवृत्त झाले.