बूथ मॅनेजमेंटची यंत्रणा सज्ज ठेवा – विनायक राऊत

बूथ मॅनेजमेंट आणि बूथ प्रमुखांसाठी मतदार यादी ही गाथा आहे. दररोज दहा घरांमध्ये भेटी दिल्या. मतदारांची ओळख झाली तर बोगस मतदार करण्याची हिम्मत कोणात नाही. संपर्क संवाद आणि संबंधित त्रिसूत्री अवलंबली तर कितीही पैसा आणि बोगस मतदार निवडणुकीत आणू दे त्यावर मात करून मशालीचा विजय कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वास शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिला. निवडणुकीतील बूथ व्यवस्था आणि मतदार यादी या विषयावर शिवसेना निर्धार शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना विनायक राऊत म्हणाले, शिवसेनेने मुंबईत शिक्षक मतदारसंघातील निवडणूक केवळ बूथ मॅनेजमेंटच्या ताकदीवर जिंकली. संपर्क संवाद आणि संबंध या त्रिसूत्रीचा अवलंब करून समोरून कितीही पैसा पोहोचला गेला तरी निवडणुका आपण जिंकू शकतो, अशी ग्वाही विनायक राऊत यांनी दिली.