कायद्याची भीती राहिली नसल्याने महाराष्ट्रात महिला असुरक्षित, विनायक राऊत यांची महायुती सरकारवर टीका

कायद्याची भीती राहिली नसल्याने आज महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. तसेच भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नसल्याने राज्याची अवस्था दयनीय झाली आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार आणि नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी महायुती सरकारवर केली आहे. सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.

काय म्हणाले विनायक राऊत?

महायुती सरकारवर (Mahayuti Govt) टीकास्त्र सोडत विनायक राऊत म्हणाले की, ”सध्याच्या भाजप आणि मिंधे गटाच्या राज्यात महाराष्ट्राच्या महिलांची सुरक्षितता अत्यंत चिंताजनक बनली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात दररोज कोणत्या ना कोणत्या महिलेवर अत्याचार होत असून हत्या केली जात आहे. अत्याचार करणाऱ्यांना आता कायद्याची भीती राहिलेली नाही. म्हणूनच आज महाराष्ट्रातील महिला अत्यंत असुरक्षित आहे. त्यांची रक्षण करण्याची जबाबदारी ज्या सरकारवर आहे, ते मात्र बेफिकीर वृत्तीने वागत आहेत.”

‘गंगेत डुबक्या मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या’, संजय देशमुख यांची टीका