येवल्यात भुजबळांना रोखले

 येवला मतदारसंघातील खरवंडी येथे मंत्री छगन भुजबळ यांना मतदान केंद्रात जाण्यास संतप्त ग्रामस्थांनी रोखले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर केंद्राला भुजबळांनी भेट दिली.

येवला मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे अॅड. माणिकराव शिंदे अशी सरळ लढत आहे. बुधवारी खरवंडी येथील मतदान केंद्रावर जाताना ग्रामस्थांनी भुजबळ यांना रोखले. मी उमेदवार असल्याने कुठल्याही केंद्रात जाण्याचा मला अधिकार आहे, असे भुजबळांनी स्पष्ट केले.