…आता घरी परतायला हवे, विक्रांत मेस्सीने पोस्ट शेअर करत इंडस्ट्रीला केले अलविदा

‘बारावी फेल’ या सिनेमातून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारा अभिनेता विक्रांत मेस्सी याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने एकच खळबळ उडाली आहे. त्याने अचानक इंडस्ट्रीमधून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली आहे. अचानक केलेल्या या घोषणेमुळे तर्कवितर्क जोडले जात आहेत.

विक्रांतच्या म्हणण्यानुसार, आता त्याला चांगला मुलगा, चांगला पिता आणि चांगला नवरा बनण्याकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. तो पुढे म्हणाला, 2025 मध्ये तो चाहत्यांना अखेरचा भेटेल. विक्रांतने त्याच्या पोस्टमध्ये लिहीले की, हॅलो, मागची काही वर्ष फार चांगली गेली आहेत. तुमच्या भक्कम पाठिंब्यासाठी मनापासून आभारी आहे. मात्र जसा जसा मी पुढे पुढे जात आहे तशी मला जाणीव झाली की, हिच वेळ आहे जिथे आपल्याला सांभाळायला हवे आणि घरी परतायला हवे. एक नवरा, एक पिता आणि मुलगा या नात्याने….आणि एक अभिनेता म्हणूनही.

विक्रांतने पुढे लिहीले की, येणाऱ्या 2025 मध्ये आपण एकमेकांना शेवटचे भेटणार. शेवटचे दोन सिनेमे आणि अनेक वर्षांच्या आठवणी. प्रत्येक गोष्टीसाठी आणि मधल्या काळात जे काही झाले त्या सर्वांचा आभारी आहे. त्यासाठी मी कायम त्यांचा ऋणी राहिन.

विक्रांत मेस्सी याच्या निवृत्तीच्या पोस्टने चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेक चाहते त्याला दूर न राहण्याची विनंती करत आहेत. एका यूजरने लिहिले की, मला सांगा की हे खरे नाही. दुसऱ्याने लिहिले, असे करू नका. अन्य एका यूजरने लिहिले  की, तुम्ही तुमच्या करिअरच्या शिखरावर आहात, असे करू नका. त्याचबरोबर त्याच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे.