विक्रांत मॅसीची अभिनयातून निवृत्ती, सोशल मीडियावरून घोषणा

बॉलिवूडमधील अभिनेत्यांपैकी एक असलेल्या विक्रांत मॅसीने सोमवारी तडकाफडकी अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली. वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी त्याने ही घोषणा केल्याने विक्रांतच्या या निर्णयाने चाहते आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. विक्रांतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही घोषणा केली आहे. पोस्टमध्ये तो म्हणतोय की, नमस्कार, माझ्यासाठी मागची काही वर्षे खूपच विलक्षण होती. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. पण, जसजसा मी आयुष्यात पुढे जात आहे, तसतसं मला जाणवतंय की, आता एक पती, वडील आणि अभिनेता म्हणूनही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे. मी अनेक वर्षांपासून माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे, परंतु आता मला वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य द्यायचे आहे. योग्य वेळ येईपर्यंत, येत्या 2025 मध्ये आपण एकदा एकमेकांना शेवटचे भेटूयात. शेवटचे दोन चित्रपट आणि काही वर्षांच्या आठवणी सोबत घेऊन सर्वांचे पुन्हा एकदा आभार. मी तुमचा कायम ऋणी राहीन, असे विक्रांतने म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

चाहत्यांना धक्का

विक्रांत मॅस्सीच्या अभिनयातून निवृत्ती घेण्याच्या या तडकाफडकी निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. अभिनयातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, त्याने अचानक निवृत्ती का घेतलीय, हे त्याने स्पष्ट न केल्याने चाहते गोंधळून गेले आहेत. त्याच्या या निर्णयाने चाहते निराश झाले आहेत. या निर्णयाने चाहते आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

विक्रांतचा अभिनय प्रवास

विक्रांतने 2007 मध्ये डिस्ने चॅनलच्या ‘धूम मचाओ धूम’ शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘धरम वीर’, ‘बालिका वधू’, ‘कुबूल है’ आणि ‘बाबा ऐसा वर ढुंढो’ यांसारख्या शोमध्ये दमदार व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. लुटेरा या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.  2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 12 वी फेल या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेने त्याने थेट प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.