स्वतःचा विकास करण्यासाठी महायुतीत धडपड, पालकमंत्री पदाच्या स्थगितीवरून विजय वडेट्टीवार टीका

दोन दिवसांपूर्वी महायुती सरकारने पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली होती. पण अवघ्या दोन दिवसांत ही यादी सरकारने मागे घेतली. महायुतीतील नेत्यांना स्वतःचा विकास करायचा आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच मोठा मलिदा कोणाला मिळणार!? यासाठी ही सगळी धडपड सुरु असेही वडेट्टीवार म्हणाले.

राज्य सरकारने पालकमंत्रीपद जाहीर केले. यामध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची घोषणा करण्यात आली होती. मात्र अनेक मंत्र्यांकडून जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नियुक्तीच्या दुसऱ्याच दिवशी स्थगितीची घोषणा करण्यात आली. पालकमंत्री पदाच्या स्थगितीवरुन आमदार विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत सरकारला सुनावले आहे. प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा महायुती सरकारची आज ही अवस्था आहे. 50 दिवसांनंतर जिल्ह्याला या सरकारने पालकमंत्री दिले. त्यात ही आता एका रात्रीत पालकमंत्री बदलण्याची नामुष्की सरकारवर आली आहे, असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.

महायुती सरकार स्थापन होऊन बराच काळ मंत्रीमंडळाचा विस्तार होत नव्हता. ‘आधी मंत्रीमंडळ विस्तार नंतर खाते वाटप आता पालकमंत्री जबाबदारी देण्यासाठी विलंब झाला आणि दिलेले पालकमंत्री बदलण्याची वेळ आली आहे. मोठा मलिदा कोणाला मिळणार!? यासाठी ही सगळी धडपड सुरु असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. जिल्ह्याचा आणि जनतेचा विकास राहिला दूर आधी स्वतःचा विकास करण्यासाठी महायुतीत धडपड सुरू आहे. असे ते म्हणाले.

रायगड आणि नाशिक जिह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती, मिंधे गटाचा थयथयाट फडणवीस बॅकफूटवर