पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

महायुती सरकार मधील एक एक मंत्र्यांचे प्रताप समोर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील एक मंत्री आहे, जो पैलवान आहे, त्याने एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, या प्रकरणी शिक्षा झाली तरी दहा हजार रुपये दंड भरून माफी मागते आणि पुन्हा त्या महिलेच्या पाठी लागतो. त्या महिलेला ब्लॅकमेल केले जाते. जर भाजप मंत्र्यांचे हे वर्तन असेल तर राज्यातील महिला सुरक्षित कश्या असतील? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

दुसरे उत्तर महाराष्ट्रातील मंत्री त्यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची 26 एकर जमीन बळकावली. मंत्रिमंडळातील मंत्री असे काळे धंदे करून फिरतात. या मंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, या मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महायुती सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे वडेट्टीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र कलंकित होतोय, स्वारगेटसारखा प्रकार भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरेंबाबत समोर येतोय; संजय राऊत यांचा महायुतीवर घणाघात

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, मी पुरोगामी विचारधारेशी जोडलो आहे, काँग्रेसचा मी निष्ठावान शिपाई आहे. पक्ष सोडण्याचा विचार ही माझ्या मनात येत नाही. सत्ता येवो न येवो मी माझ्या पक्षाचे काम करत आहे. असे असताना जातीयवादी शक्ती सोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याबाबत कोणीतरी अफवा पसरवत असल्याचे काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले