Mumbai news : सुधाकर शिंदेंनी 8 महिन्यात घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली आहे. मात्र नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने आठ महिन्यात घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का? हे देखील सरकारने स्पष्ट करावे असे म्हणत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली आहे.याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता. नोव्हेंबर 2023 पुढे सुधाकर शिंदे यांना सेवेत वाढ देता येणार नाही हा स्पष्ट उल्लेख बदलीच्या आदेशात करण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या आठ महिन्यात सुधाकर शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी झाली पाहिजे.

नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने आठ महिन्यात घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का? हे देखील आता सरकारने स्पष्ट केले पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले. यासंदर्भात त्यांनी एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच वडेट्टीवार यांनी याबाबत पत्रही लिहिले होते आणि अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता.

मूळ ठिकाणी बदली

IRS अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे गेल्या आठ वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेत कार्यरत होते. ते आयएएस अधिकारी नसताना देखील महापालिकेत कार्यरत कसे असा सवाल विरोधकांनी उचलला होता. तसेच सुधाकर शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपल्याला हवी ती कामे करून घेतात अशी देखील टीका सुरू होती. अखेर आता सुधाकर शिंदे यांची मुळ ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तसे पत्र सहसचिवांकडून देण्यात आले आहे.

अखेर IRS सुधाकर शिंदे यांची मुळ ठिकाणी रवानगी