
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाच्या रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. महापालिकेने गैरसमजातून केलेल्या तक्रारीतून वायकरांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मिंधे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
वायकरांना क्लीन चिट देण्यात आल्याचे वृत्त येतात विजय वडेट्टीवार यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. पोलिसांच्या गैरसमज कारभाराची महाराष्ट्रातील जनतेला ‘योग्य समज’, असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच आणखी आणखी एका ‘पलटी मार‘ नेत्याला क्लीन चिट देऊन स्वच्छ करून घेण्यात आले आहे, असे म्हणत मिंधे सरकारवर निशाणा साधला.
मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या तक्रारीतून रवींद्र वायकरांवर दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांनी रद्द केला आहे. भूखंड घोटाळा प्रकरणात गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. गैरसमजातून गुन्हे दाखल होतात, ही बाब पहिल्यांदाच महाराष्ट्राला कळाली, इतक्या उच्च प्रतीचे काम पोलिस करत आहे हा ही विक्रम महायुती सरकारच्या काळातच झाला आहे , हे विशेष, असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
रवींद्र वायकरांना ‘क्लीन चिट’, संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, ‘आता फक्त दाऊदला…’
गैरसमजातून असे अजून कोणते गुन्हे दाखल झाले आहेत, गैरसमजातून असे अजून किती गुन्हे मागे घेण्यात येणार, गैरसमजातून फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल होतात का? गैरसमजातून गुन्हे दाखल करण्याची समज पोलिसांना कोणी दिली? असा सवाल करत पोलिसांचा गैरसमज होत असला तरी महाराष्ट्रातील जनतेला भ्रष्ट भाजपच्या ‘वॉशिंग मशीन‘ची समज योग्य प्रकारे आहे, अशा शब्दात त्यांना भाजपवर हल्ला केला.
पोलिसांच्या गैरसमज कारभाराची महाराष्ट्रातील जनतेला ‘ योग्य समज ‘
ऐका हो ऐका, आणखी एका ‘पलटी मार‘ नेत्याला क्लीन चिट देऊन स्वच्छ करून घेण्यात आले आहे!
मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या तक्रारीतून रवींद्र वायकरांवर दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांनी रद्द केला आहे.
भूखंड…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 6, 2024
तिन्ही स्टंप उडणार
दोन वर्षापूर्वी केलेल्या गद्दारीची टीमकी वाजवणाऱ्या मिंध्यांचाही राऊतांनी समाचार घेतला. तुमचा क्षण लक्षात राहिलेला असून आता क्लीन बोल्डची वेळ आलेली आहे. तोही क्षण लक्षात ठेवा. फडणवीस, अजित पवार आणि मिंधे.. तिन्ही स्टंप उडणार आहेत, असा इशारा राऊत यांना दिला.