एसटी कर्मचारी सरकारचा लाडका नाही का? पगार कपातीवरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल

vijay-vadettiwar-congress

राज्य सरकारने यंदा एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती फक्त निम्मा पगार दिला आहे. यावरून एसटी कर्मचारी सरकारचा लाडका नाही का? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला आहे.

एक्सवर पोस्ट करून विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्वतःच्या फायद्यासाठी कितीही मोठी आश्वासने दिली तरी ती खोटीच असतात.सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना 56% पगार दिला आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांनी काम शंभर टक्के करायचे पण पगार मात्र मिळणार 56% ? एसटी कर्मचारी सरकारचा लाडका नाही का?

तसेच महायुती सरकारचे विकासाचे चित्र किती फसवे आहे हेच स्पष्ट झाले! तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार करू शकत नाही आणि बाता एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या करणार? महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा पगार त्यांना देऊ शकत नाही,यावरून राज्य दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे हे स्पष्ट आहे! असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.