जरांगेच्या आंदोलनावर सरकारची ड्रोनने नजर, आंदोलन हाताळण्याची ही पद्धत आहे का? – विजय वडेट्टीवार

मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर नजर ठेवण्यासाठी जालनाच्या अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन फिरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आंदोलन हातळण्याची ही पद्धत नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांना अधिकचे पोलीस संरक्षण तातडीने देण्यात यावे, अशी मागणी विधानसभेत केली.

ड्रोनने टेहाळणी प्रकार होत असेल तर कोण करते, कशामुळे टेहळणी केली जात आहे? आंदोलन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाने दिला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. ड्रोन कोण फिरवतेय त्यासंदर्भात सरकारने सभागृहात सविस्तर निवेदन करावे, अशी सूचनाही वडेट्टीवार यांनी मांडली. त्यावर यासंदर्भात पोलिसांकडून अहवाल घेण्यात येईल, असे उत्तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.