विधान परिषद निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी, वाचा संपूर्ण निकाल

विधान परिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे. मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीत एकूण 24 मते मिळाली. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत 12 उमेदवार उभे होते. या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शेकापचे जयंत पाटील आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव या उमेदवार होत्या. या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या 25 मतं मिळवत विजयी झाल्या. शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 22 मतं मिळाली. आणि दुसऱ्या पसंतीची तीन अधिक मतं मिळाल्याने मिलिंद नार्वेकर यांना एकूण 24 मतं मिळाली आणि ते विजयी झाले. पण या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांना फक्त 12 मतं मिळाल्याने ते पराभूत झाले.

विधान परिषद निवडणुकीचा निकाल पुढील प्रमाणे –

>> शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी

>> काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव विजयी

>> राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शेकापचे जयंत पाटील पराभूत

>> भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे विजयी

>> अजित पवार गटाचे उमेदवार राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे विजयी

>> शिंदे गटाचे उमेदवार भावना गवळी, कृपाल तुमाने विजयी