गरोदरपणात रॅम्प वॉक करताना दिसली गौहर

अलीकडेच अभिनेत्री गौहर खान हिने दुसऱ्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली. त्यानंतर आता एका कार्यक्रमात ती उंच टाचांच्या शूजमध्ये रॅम्पवर चालताना दिसली. तिच्या रॅम्प वॉकची चर्चा रंगली आहे. गौहरच्या रॅम्प वॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटीजन्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत आहेत. काही जण तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत. तर काहींनी तिला गरोदरपणात हाय हिल्स घालून न चालण्याचा सल्ला दिला आहे.