Video – महाराष्ट्र निवडणुकीची आकडेवारी जाहीर करा, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात ईव्हीएम मशिन्स हॅक करून मतांमध्ये फेरफार केल्याचा संशय महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे. यातच आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.