Video पुलावरून पाणी जात असतानाही घातली गाडी… पुढे जे काही घडलं ते आहे धक्कादायक

चंद्रपूर जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत. त्यातच शहरातील महाकाली कॉलनी परिसरातील नाला ओसंडून वाहत होता. या नाल्यावरील पुलावरून पाणी जात होते. पाणी जात असतानाही एका चार चाकी वाहनाच्या चालकाने त्याची गाडी पुलावर घातली. मात्र पाण्याचा प्रवाह इतका होता की गाडी नाल्यात वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. गाडी मधला एक तरुण बाहेर आल्याचे एका व्हिडीओत दिसत आहे तर दुसरा तरुण गाडीतच दिसला. पुढे काय घडले ते अद्याप कळू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)