प्रसाद आणि पुजेचे साहित्य विकत घेतले नाही म्हणून दुकानदारांकडून भाविकांना मारहाण, व्हिडीओ व्हायरल

लखनऊच्या चंद्रिका देवी मंदिर परिसरात दुकानदार आणि एका कुंटुंबात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या कुटुंबाने मंदिर परिसरातील दुकानदाराकडून प्रसाद आणि पुजेचे साहित्य. विकत न घेतल्यामुळे वाद झाला आणि वादाला हिंसक वळण लागले. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी 7 एप्रिल रोजी ही घटना घडली. लखनऊच्या अलिगंजचे रहिवाशी असलेले पियूष शर्मा हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत चंद्रिका देवीच्या दर्शनासाठी गेले होते. येथे मंदिर परिसरात प्रसाद आणि पुजेच्या साहित्याची अनेक दुकाने होती. यावेळी एका दुकानदाराने शर्मा यांच्या कुटुंबाला त्यांच्याच दुकानातून दार, फुले, प्रसाद घेण्याचा आग्रह केला. मात्र पियूष शर्मा यांनी त्यांना प्रसाद घेण्यापासून नकार दिला.

यामुळे दुकानदाराला राग आला आणि त्यांनी शर्मा यांच्या कुटुंबावर हल्ला केला. दोघा तिघांनी मिळून शर्मा यांच्या कुटुंबातील लोकांना काठी, पट्ट्यांने मारहाण केली. एवढेच नाही तर या नराधमांनी कुटुंबातील महिलांना देखील मारहाण केली. ही संपूर्ण घटना मंदिर परिसरात घडल्यामुळे तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.