बेळगावमधले लोकही हिंदू आहेत, मग त्यांच्यावर एवढे अत्याचार का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच बेळगावला केंद्रशासित करण्याचा ठराव मांडा, आम्ही तो एकमताने मंजूर करू असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.