विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणाला अलर्ट; मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणाला मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. या भागात पुढील चार ते पाच तासात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान नाशिकमध्ये सोमवारी दुपारी मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे नाशिकमधील अनेक भागात पाणी भरले होते.