बेरोजगारीमुळे वडील आत्महत्या करणार होते, विकी कौशलने सांगितला वडिलांचा संघर्ष

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने अभिनयाच्या जोरावर देशभरात आपला चांगला चाहता वर्ग निर्माण केला आहे. 19 जुलैला विकी कौशलचा नवीन चित्रपट ‘Bad News’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तो चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. यादरम्यान एका मुलाखतीत त्याने आपल्या वडिलांचा एक किस्सा सांगितला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याने सांगितले की एक वेळ अशी आली होती की, माझ्या वडिलांनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता.

Bad News या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या विकी कौशल आणि त्याची टीम विविध ठिकाणी भेटी देत आहे. याच दरम्यान विकी कौशल त्याच्या वडिलांच्या संघर्षाबद्दल बोलत असताना आपले मन मोकळे केले. Raj Shamani यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, “माझ्या वडिलांनी इंग्लिश साहित्यामध्ये MA केले होते. मात्र तरीसुद्धा ते बेरोजगार होते. याच टेंशनमध्ये एक दिवस मित्रांसोबत दारू पित असताना ते म्हणाले की, मला मरायचे आहे. ही गोष्ट माझ्या आजोबांना कळताच त्यांनी माझ्या वडिलांना मुंबईला पाठवले. 1978 साली ते मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सफाई कामगार म्हणून काम केले. माझ्या वडिलांच्या पिढीने खूप संघर्ष केला आहे.”  विकी कौशलने भावनिक होत वडिलांच्या संघर्षाबद्दल सांगितले.

…त्यावेळी 15 सेकंदाची जाहीरातही मिळायची नाही, विकी कौशलने जुन्या आठवणींना दिला उजाळा