विकी कौशलचा ‘छावा’ आता तेलुगू भाषेत 

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या हिंदी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 13 दिवसांत तब्बल 400 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दिवसेंदिवस कमाईचा आकडा वाढत आहे. आता खास दक्षिणेतील प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘छावा’ हा चित्रपट येत्या 7 मार्चपासून तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती ‘मॅडडॉक फिल्म्स’कडून शेअर करण्यात आली आहे.