Video – छावा चित्रपटाचा दमदार ट्रेलर लॉन्च

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून ट्रेलर पाहताना अक्षरश: अंगावर काटा उभा राहतो.