
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आणि छातीत दुखू लागल्याने आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 73 वर्षीय धनखड यांना मध्यरात्री 2 वाजता रुग्णालयात नेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी रुग्णालयात जाऊन धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. धनखड यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले.