Jagdeep Dhankhar उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना रविवारी सकाळी छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनएनआयने याबाबत माहिती दिली आहे. धनखड यांच्यावर एम्सच्या कार्डिओलॉजी विभागातील डॉ. राजीव नारंग यांच्या नेतृत्वात उपचार होत आहेत.