
ज्येष्ठ शिवसैनिक आणि हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विश्वासू, ठाकूरद्वार शाखेचे 1970 सालातील शाखाप्रमुख राजेंद्र ऊर्फ राजन मोरवाले यांचे 26 मार्च रोजी सकाळी 7 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर विरार येथील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून अखेरच्या श्वासापर्यंत ते कट्टर शिवसैनिक राहिले. मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानीय लोकाधिकार समितीचे माजी सरचिटणीस, वाशी येथील विभागप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी झोकून देऊन काम केले. मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने आणि समस्त गिरगाव गोमंतकीय परिवारातर्फे राजेंद्र मोरवाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.