
ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप सदानंद म्हात्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुली असा परिवार आहे. दिलीप म्हात्रे हे बँक कर्मचारी संघटनेचे नेते तसेच स्थानीय लोकाधिकार चळवळीच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते होते. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. मालाड देवस्थान ट्रस्टचे सेव्रेटरी म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले होते. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांसह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचे अंत्यदर्शन घेतले.