पालघर जिह्यातील सोमवंशी क्षत्रिय समाजातील ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते, कवी आणि साहित्यिक रघुनाथ माधव पाटील तथा आर.एम. पाटील यांचे केळवे, वर्तक पाखाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधान झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर केळवे येथील वैपुंठभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाटील यांची ‘मातीत मिळालं मोती’ ही कादंबरी, वणव्यातल्या वेली हे कथासंग्रह, त्याचप्रमाणे मळा, कलंदर, केळफूल हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ललित साहित्यात त्यांनी फणसातले मधुर गरे, आधार वृक्ष, कृतार्थ रघुनाथ व साठवणीतील गुलमोहर, केळव्याची शीतलादेवी अशी पुस्तके त्यांनी लिहिली.त्यांना साहित्य पुरस्कार, ‘कोकण समाज भूषण’ आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोमसापच्या कार्यकारी मंडळावर ते कार्यरत होते.