मथुरा ज्ञानदेव गायकवाड यांचे निधन

मथुरा ज्ञानदेव गायकवाड (73) यांचे बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. सातारा जिह्यातील वाघोलीच्या त्या रहिवासी. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिशय मनमिळावू स्वभाव आणि शेतीच्या कामांमध्ये रमणाऱया तसेच प्रचंड कष्टाळू म्हणून त्या नातेवाईकांमध्ये परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर वाघोली येथील मोरोबा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी 25 एप्रिल रोजी वाघोली येथे होणार आहे.